मनोरंजन

मनसे नेते अमेय खोपकरांच्या लेकाचे मराठी सिनेसृष्टीत आगमन; ‘या’ चित्रपटात दिसणार पहिली झलक

‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटात एका नव्या वळणासह सनी-बबलीच्या नात्याची कहाणी रंगणार आहे. या चित्रपटातून मनसे नेते अमेय खोपकर यांच्या सुपुत्राचा पदार्पण होणार असून, ‘उडत गेला सोन्या’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे. १८ जुलैपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mayuri Gawade

मनसे नेते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते अमेय खोपकर यांचा सुपुत्र ईशान खोपकर याने अखेर रुपेरी पडद्यावर पाऊल टाकलं आहे. ‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर आणि टायटल ट्रॅकनंतर आता गाणं ‘उडत गेला सोन्या’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून ईशानने आपली पहिली झलक दाखवत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

सनी-बबलीच्या नात्यात वळण

‘जेन झी’ ब्रेकअप थीमवर आधारित हे गाणं सनी-बबली या पात्रांच्या नात्यातील भावनिक वळण मांडतं. गाण्यात सनी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत असताना बबलीच्या मनात दाटून आलेल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. या गाण्यात ईशान खोपकर सोबतच अभिनेत्री सोनाली खरेची देखील झलक पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ईशानची ही झलक चांगलीच चर्चेत आहे.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “या गाण्यात सनी-बबलीच्या नात्याला एक इमोशनल तरीही फन टच द्यायचा प्रयत्न केला आहे. हे एक मजेशीर गाणे असले तरी या गाण्यात खूप काही घडत आहे. ज्याने कथा पुढे जातेय. आता ते काय आहे याचे उत्तर चित्रपटगृहातच मिळेल.”

अमेय खोपकरांनी केला अभिमान व्यक्त

स्वतः वडील आणि निर्माते असलेले अमेय खोपकर म्हणाले म्हणाले, “हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण या गाण्यातून माझ्या मुलाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असून हा आमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे. मला खात्री आहे संगीतप्रेमींना हे गाणं नक्कीच आवडेल.”

‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अनेक चर्चित चेहरे झळकणार आहेत. ईशानच्या प्रवेशामुळे आणि गाण्याच्या ट्रेंडी टचमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस