मनोरंजन

करीना आणि एकता कपूर मिळून उकलणार हत्येचे गूढ, येतोय नवीन चित्रपट

Kareena Kapoor and Ekta Kapoor: 'वीरे दी वेडिंग' आणि 'क्रू'च्या यशानंतर करीना कपूर आणि एकता कपूर पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

Tejashree Gaikwad

The Buckingham Murders: 'वीरे दी वेडिंग' आणि 'क्रू' सारख्या यशस्वी चित्रपटात करीना कपूर खान आणि एकता कपूर यांनी एकत्र काम केले. आता पुन्हा एकदा ही जोडी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. या जोडीने चित्रपट निर्माता हंसल मेहता यांच्या 'द बकिंगहॅम मर्डर्स' या आगामी चित्रपटासोबत सर्वांचं मनोरंजन करायचं ठरवलं आहे. यापूर्वी कॉमेडी चित्रपटाने मने जिंकणारी ही जोडी आता मर्डर मिस्ट्री घेऊन येत आहे. या चित्रपटातून करीना कपूर खान सहनिर्माती म्हणूनही काम करणार आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट 'मामी' फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला आहे प्रदर्शित

चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये चित्रपटात मिस्ट्री असेल हे दिसून येते. या हत्येचे रहस्य उलगडण्यासाठी प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिओ 'मामी' फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट बनला आहे. हा चित्रपट एक थ्रिलर आहे जो रहस्ये आणि नातेसंबंधांवर प्रकाश टाकेल, तसेच एका छुप्या खुनाच्या गूढतेचे गूढ उकलणारी कथा देखील आहे. रिलीज डेट जाहीर करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

चित्रपटात कोण आहेत कलाकार?

करीना कपूर खान, ऍश टंडन, रणवीर ब्रार आणि किथ ऍलन यांसाखे कलाकार आहेत. हंसल मेहता यांनी 'द बकिंगहॅम मर्डर्स' दिग्दर्शित केला आहे आणि असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कर यांनी लिहिलेला आहे. शोभा कपूर, एकता आर कपूर आणि करीना कपूर खान अभिनीत या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि टीबीएम फिल्म्स यांनी केली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश