मनोरंजन

करणी सेना अध्यक्ष सुरजित सिंह राठोड अटकेत, 'हे' धक्कादायक कारण आले समोर

सुरजित सिंह राठौर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. एवढेच नाही तर अनेकदा माध्यमांसमोर त्यांनी करणी सेनेची बाजू मांडली

प्रतिनिधी

चित्रपट निर्माते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठोडला मुंबईतील बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. सुरजित सिंह राठौरवर एका मॉडेलने विनयभंग आणि मारहाणीचा आरोप केला आहे. मॉडेलने एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठौर यांच्यावर कारवाई केली आहे. सुरजितसिंग राठोड हे करणी सेनेचे अध्यक्ष असल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेलने केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सुरजित सिंह राठौर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. एवढेच नाही तर अनेकदा माध्यमांसमोर त्यांनी करणी सेनेची बाजू मांडली आहे. सुरजित सिंह राठौर हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मॉडेलने केलेल्या गंभीर आरोपानंतर पोलीस सुरजित सिंग राठोडची चौकशी करत आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुरजित सिंह राठोड चर्चेत आला होता, जेव्हा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरजितने थेट अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला होता. 

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण