मनोरंजन

Katrina Kaif Pregnancy : ऑफिशियल गुडन्यूज! कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच होणार आई-बाबा, बेबीबंपची पहिली झलक

काही महिन्यांपासून कतरिनाच्या प्रेग्नन्सीबाबत चर्चा रंगत होत्या, पण आता या दांपत्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चांना दुजोरा दिला आहे...

Mayuri Gawade

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अखेर ते आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. काही महिन्यांपासून कतरिनाच्या प्रेग्नन्सीबाबत चर्चा रंगत होत्या, पण आता त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही बातमी शेअर केली आहे.

फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

कतरिनाने इन्स्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे, ज्यात ती बेबी बंपसह दिसत आहे. फोटोमध्ये विकी तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. त्यांनी लिहिले आहे, “On our way to start the best chapter of our lives with hearts full of joy and gratitude.”

विकी आणि कतरिनाच्या या पोस्टवर काही क्षणातच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. तसेच अनेक कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिना आणि विकी यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले होते. लग्नानंतर चार वर्षांनी आता दोघे आई-बाबा होणार आहेत. प्रेग्नन्सीची माहितीही त्यांनी सुरुवातीला गुप्त ठेवली होती, त्यामुळे कतरिना काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसली नव्हती. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कतरिनाची डिलिव्हरी ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल