मनोरंजन

Vikas Sethi: अभिनेता विकास सेठी यांचे निधन

क्योंकी सास भी कभी बहू थी, कहीं तो होगा, ससुराल सिमर का यासारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनेता म्हणून झळकणाऱ्या विकास सेठी यांचे शनिवारी रात्री नाशिकमध्ये निधन झाले.

Swapnil S

मुंबई : क्योंकी सास भी कभी बहू थी, कहीं तो होगा, ससुराल सिमर का यासारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनेता म्हणून झळकणाऱ्या विकास सेठी यांचे शनिवारी रात्री नाशिकमध्ये निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि जुळी मुले आहेत.

पत्नी जान्हवी सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाशिकला आले होते. "आम्ही नाशिकला माझ्या आईच्या घरी पोहोचल्यावर विकासला उलट्या झाल्या. डॉक्टरांनी घरी येऊन त्याच्यावर उपचार केले. सकाळी ६ च्या सुमारास (रविवारी) विकासला उठवायला गेले तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. डॉक्टरांनी सांगितले की, काल रात्री झोपेतच त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले", असे जान्हवी हिने वृत्तसंस्थेला सांगितले.

सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते, विरोधकांची १४ मते फुटली

नेपाळमध्ये आगडोंब! संसद, राष्ट्रपती भवन आणि मंत्र्यांची घरे जाळली

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

'सोन्याचा भडका'; १० ग्रॅम सोने १.१२ लाखांवर, दिवसभरात दरात ५,०८० रुपयांनी वाढ

सियाचीनमध्ये हिमस्खलनात लष्करातील ३ जवान शहीद; अनेक जण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू