मनोरंजन

अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक; मायलेकींनी 'गुलाब गॅंग'साठी गायले होते गाणे

प्रतिनिधी

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांची आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या. माधुरी दीक्षितने याबाबत माहिती दिली असून आज सकाळी ८.४० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने माधुरी आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आज वारली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मधुर दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. २७ जून २०२२ला माधुरीने आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक पोस्ट केली होती. तिने लिहिले होते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, ते म्हणतात की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. ते अधिक योग्य असू शकत नाहीत. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही, तू मला शिकवलेले धडे ही तुझ्याकडून माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. मी तुम्हाला फक्त चांगले आरोग्य आणि आनंदाची शुभेच्छा देतो!" विशेष म्हणजे, स्नेहलता दीक्षित या गायिकादेखील होत्या. त्यांनी माधुरी दीक्षितसोबत 'गुलाब गॅंग' या चित्रपटामध्ये गाणे गायले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त