मनोरंजन

Maha Kumbh 2025: गंगेत डुबकी Riva Arora ला पडली महागात, कपड्यांवरून झाली ट्रोल (View Pics)

सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री रीवा अरोरा (Riva Arora) नुकतीच महाकुंभ मेळ्यात पोहोचली आणि तिथला अनुभव तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. तिने गंगा नदीत स्नान करतानाचे अनेक फोटो पोस्ट केले. काही चाहत्यांनी फोटोंचं कौतुक केलं असलं तरी अनेकांनी तिला ट्रोल करीत टीका केली.

Krantee V. Kale

सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री रीवा अरोरा (Riva Arora) नुकतीच महाकुंभ मेळ्यात पोहोचली आणि तिथला अनुभव तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. तिने गंगा नदीत स्नान करतानाचे अनेक फोटो पोस्ट केले. काही चाहत्यांनी फोटोंचं कौतुक केलं असलं तरी अनेकांनी तिला ट्रोल करीत टीका केली.

रीवाने फोटो शेअर करत लिहिले, "जीवनात एकदाच पाहण्यासारखा जादूई क्षण – महाकुंभाचा पवित्र नजारा." या पोस्टसोबत तिचे विविध पोजमधील फोटो बघून मात्र नेटकरी चिडले. खऱ्याखुऱ्या अध्यात्मिक अनुभवापेक्षा फोटोशूट करण्यासाठीच ती गेली होती असं अनेकांनी म्हटलं आणि 'शोबाजी' करणारी म्हणून तिला ट्रोल केलं.

पहिल्यांदाच ट्रोलिंग नाही!

तथापि, ट्रोलिंगचा सामना करावा लागण्याची रीवा अरोराची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही, तिने स्वतःच्या वयापेक्षा खूप मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले होते. एका जुन्या मुलाखतीत या टीकेला उत्तर देताना ती म्हणाली होती, "मी यावर काय उत्तर देऊ? माझ्या वयाबद्दल किंवा मी काय करते, याबद्दल शंका घेणाऱ्या लोकांसाठी माझ्याकडे काहीही नाही. जे लोक मला प्रेम देत आहेत, तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत."

बघा रीवा अरोराचे ते फोटो ज्यामुळे झाली ट्रोल -

यशस्वी बालकलाकार

रीवा अरोराने एक बालकलाकार म्हणून मोठं यश मिळवलं आहे. तिने "उरी: द सर्जिकल स्ट्राइक" (Uri: The Surgical Strike), "गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल" (Gunjan Saxena: The Kargil Girl) आणि "सेक्शन 375" (Section 375) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच, तिने "टीव्हीएफ ट्रिपलिंग सीझन २" (TVF Tripling Season 2) मध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे, इम्तियाज अली (Imtiaz Ali) दिग्दर्शित "रॉकस्टार" (Rockstar) या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते.

नवीन वेब सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका

सध्या रीवा "जिओहॉटस्टार" (JioHotstar) वरील "पॉवर ऑफ पांच" (Power Of Paanch) या वेब सिरीजमध्ये झळकत आहे. यात जयवीर जुनेजा (Jaiveer Juneja), आदित्य राज अरोरा (Aditya Raj Arora) आणि उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) यांच्यासोबत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास