मनोरंजन

मायराची नवी हिंदी मालिका , प्रार्थना बेहेरेने केलं कौतुक

‘माझी तुझी रेशीमगाठ’ नंतर मायरा वायकुळ नव्या मालिकेत

नवशक्ती Web Desk

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे या लोकप्रिय कलाकारांच्या जोडीला आणखी एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे मायरा वायकुळ. . मायराला या मालिकेमुळे अल्पावधीत प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.मायराची या मालिकेमधील भूमिका लक्षात राहणारी ठरली. मायराचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोवर्स आहेत. तिचे विडिओ आणि फोटो नेहमीच वायरल होत असतात.मराठी बालकलाकारांमध्ये मायराचं नाव अग्रगणी घेतलं जातं.

आता मायरा लवकरच एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कलर्स’ या वाहिनीवर मायराची नवी मालिका येत आहे. ‘नीरजा- एक नई पहचान’ असं या मालिकेचं नाव आहे. मायरा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे .

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने हा व्हिडीओ पाहून केलेली कमेंट लक्ष वेधून घेणारी आहे. मायराच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रार्थना म्हणाली, “बेबी, तुझं खूप खूप अभिनंदन. मला तुझा खूप अभिमान आहे”. अनेक कलाकार मायराला या नव्या हिंदी इंनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत.

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

भारताची मोठी कामगिरी; कल्पक्कममध्ये जगातील पहिला अणुभट्टीच्या उष्णतेवर चालणारा हायड्रोजन प्रकल्प सुरू

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले