मनोरंजन

Sonu Nigam : "मुंबई म्हणजे सर्वात..." सोनू निगमवर झालेल्या हल्ल्यानंतर काय म्हणाला मिका सिंग?

प्रतिनिधी

२० फेब्रुवारीला प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्या चेंबूरमधील कार्यक्रमात त्याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. आता यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगनेही (Mika Singh) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, "मुंबई म्हणजे सर्वात सुंदर आणि सुरक्षित शहर आहे. सर्वच कलाकारांना मान द्यायला हवा, असे माझे मत आहे." असे मत त्याने व्यक्त केले आहे.

मिका सिंग आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे की, "आदरणीय गायक सोनू निगम यांच्यावर मुंबईत हल्ला झाला हे ऐकून खूप वाईट वाटले, हे धक्कादायक आहे. जेव्हा मी उत्तर भारतात कार्यक्रम करतो तेव्हा माझ्याबरोबर १० अंगरक्षक असतात, पण मुंबईत माझ्याबरोबर अंगरक्षक नसतात. कारण, हे शहर भारतातील सर्वात सुंदर आणि सुरक्षित शहर आहे. सर्वच कलाकारांना मान द्यायला हवा, असे माझे मत आहे. लोकांनी आम्हाला बनवले आहे, आम्ही लोकांसाठी आहोत. सोनू निगम आम्ही तुमच्याबरोबर आहोत." अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल