मनोरंजन

Mirzapur Season 3: 'मिर्झापूर'च्या जंगलात होणार पुन्हा लढत, नवीन सीजन 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Mirzapur Season 3 Teaser: 'मिर्झापूर शोचा दमदार टीझर आला आहे ज्याने सोशल मीडियावर येताच खळबळ उडवून दिली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि विजय वर्मा अभिनीत, मिर्झापूर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashree Gaikwad

Mirzapur 3 release date: 'मिर्झापूर' एक असा शो ज्याच्या सिजन्सची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. ही ओटीटीच्या सर्वाधिक आवडलेल्या मालिकांपैकी एक आहे. तिच्या पुढील सिजनसाठी लोक आतुरतेने वाट बघत आहेत. 'मिर्झापूर ३'ची प्रतीक्षा काही दिवसांत संपणार आहे. मंगळवारी, ११ जून रोजी, मिर्झापूरच्या निर्मात्यांनी रिलीजच्या तारखेसह बहुप्रतिक्षित टीझरचे अनावरण केल्यानंतर चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या मालिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, इशा तलवार, अंजुम्म शर्मा, प्रियांशू पैन्युली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चढ्ढा, मेघना मलिक चा समावेश आहे.

टीझरची सुरुवात कुलभूषण खरबंदा यांच्या व्हॉईसओव्हरने होते, पुढे, त्यात विजय, अली, श्वेता आणि ईशा यांच्यासह इतर पात्रांची झलक दिसते.

तिसऱ्या सीझनमध्ये कालीन भैय्याचे दमदार पुनरागमन झालेले दिसते. रिलीजच्या तारखेची घोषणा करताना निर्मात्यांनी लिहिले, "कर दिए प्रबंध #MS3W का. तारीख नोट कर लिजिये❤ #MirzapurOnPrime, ५ जुलै."

कथा पूर्वीपेक्षा अधिक खास

'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त भीती आणि थरार पाहायला मिळणार आहे. समोर आलेला हा टीझर प्रेक्षकांच्या हृदयाला हादरवून गेला आहे. सीझन ३ सह, कथेचा कॅनव्हास मोठा झाला आहे. या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी म्हणजेच 'कालिन भैया' आणि 'गुड्डू पंडित' (अली फजल) यांच्यातील लढतही अधिक खास पद्धतीने पाहायला मिळणार आहे.

दहा भागांची मालिका ५ जुलैपासून प्राइम व्हिडीओवर खास प्रीमियर होईल.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता