मनोरंजन

Alia Bhatt : पोलिसांनी या कारणासाठी साधला अभिनेत्री आलिया भट्टशी संपर्क

प्रतिनिधी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. मात्र, यावेळी तिच्या सोबत घडलेल्या प्रकरणाची अधिक चर्चा होत आहे. झाले असे की, आलिया भट्ट तिच्या घरामध्ये आराम करत असल्याचे काही फोटो एका मीडिया पोर्टल दाखवण्यात आले. यानंतर संपूर्ण बॉलिवूडने त्यावर नाराजी व्यक्त केली. फोटोमध्ये आलिया भट्ट तिच्या घरात बसलेली दिसत असून हे चित्र जवळच्या इमारतीमधून झूम लेन्सद्वारे क्लिक केलेले आहे. हे असे करणे म्हणजे कलाकारांच्या प्रायव्हसीमध्ये दखल देणे असून हे बरोबर नसल्याची टीका आलिया भट्ट तसेच, अनुष्का शर्मा आणि जान्हवी कपूरनेही केली.

या घटनेननंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री आलिया भट्टशी संपर्क साधला. एका फोटोग्राफरने तिचे खाजगी फोटोस क्लिक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास तिला सांगितले आहे. हे फोटो ऑनलाइन पोर्टलवर प्रकाशित झाली असून आलियाने पोलिसांना सांगितले आहे की तिची टीम संबंधित पोर्टलच्या संपर्कात आहे. त्यामुळे आता यावर काय कारवाई होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आलिया तिच्या घरामध्ये आराम करत असताना दोन पापाराझींनी फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. जेव्हा तिला याची माहिती मिळाली, तेव्हा तिला हे पाहून धक्का बसला. यानंतर तिने मुंबई पोलिसांना यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

आलियाने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली होती. तिने तो फोटो स्टोरीवर ठेवत म्हंटले होते की, "नेहमीप्रमाणे मी दुपारी माझ्या घरी विश्रांती घेत होते. तेवढ्यात मला असे वाटलं की कोणीतरी मला बघत आहे. मी वर पाहिले तर शेजारच्या इमारतीच्या छतावर कॅमेरे घेऊन दोन लोक दिसले. एखाद्याचे असे फोटो घेणे कितपत योग्य आहे? प्रायव्हसीचे उल्लंघन करण्याची हद्द झाली. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. पण तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली, असंच म्हणावं लागेल," असे म्हणत तिने या गोष्टीचा निषेध व्यक्त केला.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण