मनोरंजन

Like ani Subscribe: प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा 'लाईक आणि सबस्क्राईब'चा रहस्यमयी टिझर प्रदर्शित

Amruta Khanvilkar, Amey Wagh: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या १८ ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत.

Tejashree Gaikwad

Upcoming Movie: काही दिवसांपूर्वी 'लाईक आणि सबस्क्राईब'  (Marathi Movie Like ani Subscribe) चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा एक सेल्फी होता. ज्यात सेल्फी आणि प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आह, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या १८ ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत. दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एकंदरच या चित्रपटाचा टिझर अंगावर शहारा आणणारा आहे. टिझरमध्ये जुई भागवत एका व्लॅागरच्या भूमिकेत दिसत असून ती एका मोठ्या संकटात अडकल्याचेही दिसतेय. तर दुसरीकडे अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? डेड बॉडी प्रकरण काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविकार कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ''लाईक आणि सबस्क्राईब' पाहून मिळणार आहेत. चित्रपटाचा हा रहस्यमयी टिझर पाहून कथा कमाल असणार, हे नक्की !

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, " हल्लीच्या काळात लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो, हे सगळे सोशल मीडियावरील शब्द दैनंदिन वापरातील झाले आहेत. या सगळ्याभोवती फिरणारी ही रहस्यमयी कथा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल. प्रत्येक सीन कथेला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारा आहे. रोहित चौहान, डेड बॉडी, पोलीस तपास या सगळ्याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.''

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, '' मराठी चित्रपटांमध्ये हल्ली अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. हासुद्धा एक वेगळा विषय आहे. चित्रपटातील कलाकार, संगीत टीम, दिग्दर्शन, तंत्रज्ञ अशा सगळ्याच गोष्टी खूप उत्तम जुळून आल्या आहेत. हा चित्रपट खरंतर एक कौटुंबिक चित्रपट आहे. मात्र तरुणाईची पसंती मिळवण्यात 'लाईक आणि सबस्क्राईब' नक्कीच यशस्वी होईल.''

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

IND W Vs SL W Asian Games Final: भारताची सुवर्णपदकासाठी आज श्रीलंकेशी लढत