मनोरंजन

'ओएमजी २' नेटकऱ्यांच्या रडावर! अक्षय कुमारचा लुक पाहुन दिली थेट धमकी

२०१२ साली हिट झालेल्या 'ओ माय गॉड' या चित्रपटाचा 'ओमजी २' हा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

नवशक्ती Web Desk

२०१२ साली हिट झालेल्या 'ओ माय गॉड' या चित्रपटाचा 'ओमजी २' हा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आगामी सिनेमाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यात अभिनेता अक्षय कुमार हा भगवान शंकराच्या अवतारात दिसत आहे. तर दुसरीकडे पंकज त्रिपाठी हा त्याच्या व्यक्तीरेखेत पाहायला मिळत आहे. ही दोन्ही पोस्टर अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ही पोस्टर पाहुन नेटकरी मात्र संतापले आहेत. "हिंदू धर्माचा अपमान करणारा हा चित्रपट नसावा, हिच अपेक्षा," असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

'ओएमजी' मध्ये श्रीकृष्णाच्या भूमिकेत पाहयला मिळालेला अक्षय कुमार 'ओएमजी २' चित्रपटात भगवान शंकराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा अवतारात दिसत आहे. 'ओएमजी २' ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येईल, असं त्याने हे पोस्टर शेअर करत लिहलं आहे. तर पंकज त्रिपाठी असलेला दुसरा पोस्टर शेअर करत त्याने लिहलं आहे की, 'सत्याच्या मार्गावर भेटू'

हे पोस्टर पाहुल नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "जर या चित्रपाटात काही हिंदू धर्माविषयी काही उलटसुटल दाखवलं तर काही खैर नाही. कारण बॉलिवूडचे चित्रपट जेव्हा पाहतो तेव्हा त्यात हिंदू धर्माविषयी अपमानजनक चित्रण दाखवलं जातं. तुमच्याकडून चांगली अपेक्षा आहे. जय महाकाल" तर दुसऱ्या युजरने तर थेट धमकी दिली आहे. "हिंदु धर्माचा अपमान केला तर विचार करा काय होईल?" असं त्याने म्हटलं आहे. "आता 'आदिपुरष' नंतर भगवान शंकराबरोबर चेष्टा नको." असं तिसऱ्या युजरने म्हटलं आहे.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत