Lampan 
मनोरंजन

Lampan: 'प्रकाश नारायण संत' यांच्या कथांवर आधारित 'लंपन' सिरीज लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Tejashree Gaikwad

Marathi Web Series: प्रकाश नारायण संत यांची लोकप्रिय कादंबरी ‘वनवास'वर आधारित ‘लंपन' ही सिरीज लवकरच रिलीझ होणार आहे. सिरीज एका मुलाबद्दल आहे ज्याला त्याच्या आजी-आजोबांसोबत राहण्याचा पर्याय देण्यात आला आहे परंतु त्याला त्यांच्यासोबत राहण्याची इच्छित नाही. या निरागस व आत्‍म-शोध घेणाऱ्या हृदयस्‍पर्शी कथेमध्‍ये मिहिर गोडबोले यांनी लंपनची भूमिका साकारली आहे. ही सिरीज १६ मे रोजी सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज तरूण मुलगा लंपनच्‍या आत्‍म-शोधाच्‍या प्रयत्‍नांच्‍या कथेला दर्शवते. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार देखील भूमिका साकारत आहेत. लंपनच्या ‘आजी'च्‍या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, आजोबाच्‍या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी, जिवलग मैत्रिण सुमीच्‍या भूमिकेत अवनी भावे, वडिलांच्‍या भूमिकेत पुष्‍कराज चिरपुटकर आणि लंपनच्या आईच्‍या भूमिकेत कादंबरी कदम असणार आहे.

काय म्हणाले कलाकार?

आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना गीतांजली म्‍हणाल्‍या, “मी प्रकाश नारायण संत जी यांच्‍या लक्ष वेधून घेणाऱ्या कथा ऐकत मोठे झाले आणि त्‍यांच्‍या कथांमधील जादुई विश्‍वाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतले. आता, त्‍यांच्‍या लोकप्रिय कलाकृतीमधील एका पात्राची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. लंपनच्‍या आजीची भूमिका साकारण्‍याचा अनुभव अद्वितीय आहे. तिला प्रेमाने आजी म्‍हणून हाक मारतात. ती लंपनवर प्रेमाचा वर्षाव करते, तसेच त्‍याला मार्गदर्शन देखील करते, आपुलकी दाखवण्‍यासह शिस्‍तबद्धतेचे धडे देते. जुन्‍या आठवणींकडे घेऊन जात ही सिरीज तुम्‍हाला सहजगत्या काळाचा अनुभव देते, जेथे कौटुंबिक नाते आणि बालपणातील निरागसतेला अधिक महत्त्व दिले जाते.''

निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन

निपुण धर्माधिकारी यांनी या सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. या सिरीजची निर्मिती श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आहेत. तरूण मुलगा लंपन कसा बालपणीच्‍या गुंतागुंतीमधून जातो. त्याचा रोमांचक प्रवासाचा अनुभव याबद्दल या सिरीजमध्ये बघायला मिळेल.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस