मनोरंजन

'सुशीला-सुजीत'मध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल “इतक्या” भूमिका निभावणार प्रसाद ओक !

प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन तर करणार आहे पण सोबतीने बाकी काही खास भूमिका देखील निभावताना दिसणार आहे.

Krantee V. Kale

एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फार फार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो पण आगामी सुशीला-सुजीत या चित्रपटामध्ये प्रसाद ओक एक दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन तर करणार आहे पण सोबतीने बाकी काही खास भूमिका देखील निभावताना दिसणार आहे.

"सुशीला - सुजीत" चित्रपटात प्रसाद करत असलेल्या तब्बल पाच भूमिका नक्की कोणत्या? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. प्रसाद या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे दिग्दर्शक आहे. सोबतीला तो या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारतोय! चित्रपटाची कथा प्रसादचीच आहे. या चित्रपटाचा प्रसाद निर्माता सुद्धा आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटात प्रसादनी एक सुंदर गाणं देखील गायलं आहे.

एवढ्या सगळ्या भूमिका आणि त्या सुद्धा एकाच चित्रपटासाठी निभावणं ही खरंतर तारेवरची कसरत म्हणावी पण प्रसादनी या सगळ्या भूमिका एकदम चोख पार पाडल्या आहेत. ज्या येत्या १८ एप्रिलला सिनेमागृहात बघायला मिळतील.

आजवर प्रसादने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट दमदार चित्रपट तर दिले आहेत. पण आगामी सुशीला-सुजीतची प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे. प्रसाद प्रत्येक सिनेमात काही न काही तरी वेगळा प्रयत्न करून प्रेक्षकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच आता प्रेक्षकांना सुशीला - सुजीत मध्ये काय वेगळं बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. एकाच चित्रपटात या अशा ५ भूमिका निभावणारा प्रसाद हा खरोखरच मराठीतला एक हरहुन्नरी कलाकार आहे असं म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video