मनोरंजन

"लॉकडाउन लव्हस्टोरीचे हार्ट फॉरएव्हरसाठी लॉक", क्षितिजासह लग्नबंधनात अडकताच प्रथमेशची भन्नाट पोस्ट

क्षितीजा घोसाळकरशी आज प्रथमेशने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

Swapnil S

'टाइमपास' या गाजलेल्या सिनेमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब आज २४ फेब्रुवारी रोजी त्याची रिअल लाइफ प्राजू म्हणजेच अभिनेत्री क्षितिजा घोसाळकर हिच्यासोबत बोहल्यावर चढला. 'प्रतिजा' या टोपणनावाने नेटकऱ्यांमध्ये ओळख असलेल्या या जोडप्याने लग्नगाठ बांधून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

लग्नानंतर प्रथमेशने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली. त्यासोबत त्याने लिहिलेले कॅप्शन भन्नाट आहे. "लॉकडाउन लव्हस्टोरीचे हार्ट फॉरएव्हरसाठी लॉक झाले" अशा आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे. त्याद्वारे लॉकडाउनमध्येच दोघांची 'लव्ह स्टोरी' सुरू झाली होती हे स्पष्ट होते. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर प्रथमेश आणि क्षितिजाची पहिल्यांदा ओळख झाली होती. क्षितिजाने त्याआधी प्रथमेशचे अनेक सिनेमे पाहिले होते. पण, ती सोशल मीडियावर त्याला फॉलो करत नव्हती. अचानक एक दिवस प्रथमेशने तिला मेसेज केला, त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढली. नंतर प्रथमेशच्या एका सिनेमाच्या चित्रीकरणावेळी त्यांची पहिल्यांदा भेट झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. भेटीगाठी वाढू लागल्या आणि तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

लग्नात क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता आणि बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी त्याने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. याशिवाय प्रथमेशने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता. दरम्यान, प्रथमेशच्या लग्नाच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सायली संजीव, रवी जाधव यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

Mumbai: धक्कादायक! लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश