मनोरंजन

राखी सावंतने पती आदिल खानवर केले 'हे' गंभीर आरोप

नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा पती आदिल खानवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

प्रतिनिधी

प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले. यानंतर पुन्हा एकदा आता तिच्या आदिल खानसोबत झालेल्या लग्नाबद्दल माध्यमांसमोर नवीन ड्रामा सुरु केला आहे. यावेळी तिने पती आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, "मी मराठी बिग बॉसच्या घरामध्ये असताना अदिलच दुसऱ्या मुलीसोबत अफेअर होते." यापूर्वीही तिने अदिलसोबत झालेल्या लग्नाबद्दल मोठा ड्रामा केला होता.

राखी सावंत म्हणाली आहे की, "आदिल हा खोटारडा असून माझा वापर करुन त्याला प्रसिद्धी मिळवायची होती. त्याच्याविरोधात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. आदिलचे दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असून कुराणवर हात ठेवून त्याने त्या मुलीला ब्लॉक करण्याचे वचन दिले होते. पण प्रत्यक्षात त्याने तसे केले नाही. आता ती मुलगी आदिलला ब्लॅकमेल करत आहे. मला कोणालाही मोठे बनवायचे नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या मुलाखती घेऊन त्याला प्रसिद्धी मिळवून देऊ नका.” राखी सावंत व आदिल खानने मे महिन्यामध्ये कोर्ट मॅरेज केले होते. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस