मनोरंजन

कॉफी विथ करणंनंतर रणवीरला केलं जातंय ट्रोल; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल...

या शोमध्ये रणवीरन सांगितले की, दीपिकासोबत त्याची पहिली भेट वर्सोवा येथील संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती

नवशक्ती Web Desk

करण जोहरचा सर्वात वादग्रस्त आणि तेवढाच चर्चेत असलेला शो 'कॉफी विथ करण'चा 8 वा सीझन 26 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या आठव्या सिझनची सुरुवात बॉलिवूडचे पावरफुल्ल कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या जोडीने झाली. यावेळी चाहत्यांना रणवीर आणि दीपिकाच्या जोडीची अनेक सिक्रेट कळाली आहे. या सिझनमध्ये त्यांनी त्यांचा लग्नाचा व्हिडिओ देखील चाहत्यांना दाखवला आहे. आणि तो विडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. त्याचबरोबर या दोघांनी त्यांची लव्ह स्टोरी चाहत्यांना सांगितली. त्यांची पहिली भेटं कशी आणि कुठं झाली. हे रणवीरनं सांगितलं. मात्र, हे सांगताना रणवीरनं एक चुक केली ज्यामुळे सोशल मिडियावर तो प्रचंड ट्रोल होत आहे.

जेव्हा रणवीर सिंग दीपिकाला कसा भेटला हे सांगत होता तेव्हा त्याचे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचे जुने व्हिडिओ शेअर करत त्याच्यावर टीका केली आहे. आता हाच व्हिडिओ अभिनेता कमाल राशीद खान याने देखील सोशल मिडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ शेयर करत रणवीरला ट्रोल केलं जातं आहे.

या शोमध्ये रणवीरन सांगितले की, दीपिकासोबत त्याची पहिली भेट वर्सोवा येथील संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती.

रणवीरन सांगितलं की, जेव्हा तो राम-लीलाच्या स्क्रिप्टवरती चर्चा करण्यासाठी संजय लीला भन्साळींच्या घरी गेला तेव्हा तो टेबलाजवळ बसला होता आणि दरवाजा समोर होता. भन्साळी हे समुद्राजवळ राहतात, त्यामुळे दार उघडताच समुद्रातून वाऱ्याची झुळूक येताच दीपिका आत आली तिन पांढरी चिकनकारी वस्त्र परिधानं केलं होतं

मात्र, हिच लाईन रणवीर यापुर्वी देखील बोलला होता मात्र, ते दिपीकासाठी नव्हे तर अनुष्कासाठी होते. रणवीरची अनुष्कासोबत पहिली भेट ही यशराज फिल्म्सच्या ऑफिसमध्ये झाली होती. त्याने हिच स्क्रिप्ट तेव्हाही सांगितली. आता हा व्हिडिओ शेयर करत केआरकेनं लिहिलंय की, "ये है ढोलकी ! लबाड #RanveerSing एकाच शोमध्ये अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोनबद्दल एकच गोष्ट सांगत आहे!" सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी रणवीरला ट्रोल करत आहेत.

न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; २४ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई