मनोरंजन

आता वरून धवनसोबत दिसणार समांथा; या वेबसिरीजची होतेय चर्चा

प्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझीतील इंडियन ओरिजनल सिरीजमध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु साकारणार मुख्य भूमिका

वृत्तसंस्था

प्राइम व्हिडिओने आज घोषणा केली कि, प्राइम व्हिडिओ आणि रूसो ब्रदर्स AGBOची ग्लोबल इवेंट सिरीज, सिटाडेल यूनिवर्सच्या भारतीय इंस्टॉलमेंटमध्ये वरूण धवनसह प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभु मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'फॅमिली मॅन'चे राज आणि डीके यांनी भारतात बनवलेल्या या अनटायटल्ड सिटाडेल सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, सीता आर. मेनन आणि राज आणि डीके यांनी या लोकल इंस्टॉलमेंट सिरीजचे सहलेखन केले आहे. स्ट्रिमिंग सर्व्हिसने दिलेल्या अपडेटनुसार असे समजते कि, सध्या मुंबईमध्ये याच्या प्रोडक्शनचे काम सुरु आहे. यानंतर, युनिट उत्तर भारतात, सर्बिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर जाणार आहे. अशातच, हि अनटायटल्ड इंडियन ओरिजिनल सिटाडेल सिरीज जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होईल.

समांथा याबद्दल म्हणाली की, "जेव्हा प्राइम व्हिडिओ आणि राज आणि डीके यांनी या प्रोजेक्टसाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी त्वरित त्यांच्यासोबत काम करण्याच्या निर्णय घेतला. 'द फॅमिली मॅन'मध्ये मी या टीमसोबत काम केले आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी घरवापसीसारखे आहे. सिटाडेल यूनिवर्स आणि जगभरातील प्रॉडक्शन्समधील परस्परसंबंधित कथानक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय इंस्टॉलमेंटच्या स्क्रिप्टने मला उत्साहित केले. रुसो ब्रदर्सच्या संकल्पनेवर आधारित या उत्कृष्ट यूनिवर्सचा भाग बनण्याची मला संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. तसेच, या प्रोजेक्टद्वारे मला वरुणसोबत पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली याचाही मला आनंद आहे. ते एक अतिशय उत्साही व्यक्ती आहेत आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण नेहमी आनंदी ठेवतात."

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव