मनोरंजन

Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामले यांना कलाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर

नुकतेच प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या नाटकांचे १२५०० प्रयोग पूर्ण झाले. त्यांचे मराठी नाटक क्षेत्रात अमूल्य योगदान आहे.

प्रतिनिधी

मराठी नाटक क्षेत्रातील एक नामवंत कलाकार प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. अशामध्ये त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांना कलाक्षेत्रात मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतः प्रशांत दामले यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रशांत दामले यांनी, "आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. असंच प्रेम असु दे" असे म्हणत सर्वांचे आभार मानले. संगीत, नाट्य आणि नृत्य क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. प्रशांत दामले हे १९८३ पासून नाटक, चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट केले आहेत. त्यांचे नाटकावरील प्रेम हे जगजाहीर आहे. नुकताच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला.

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती; मुंबई उच्च न्यायालयाकडून समिती स्थापन

शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही! मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा

आम्ही खूप झगडलो, पण ही फार दुर्दैवी गोष्ट! लोकपाल सदस्यांना BMW देण्यावरून अण्णा हजारे नाराज

मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्प यांची भेट टाळली; 'आसियान' शिखर परिषदेला आभासी पद्धतीने उपस्थित राहणार