बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र; 'विष्णूबाळा' चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे 
मनोरंजन

बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र; 'विष्णूबाळा' चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. आगामी ‘विष्णूबाळा’ चित्रपटातून ही बापलेकाची जोडी प्रथमच एकत्र झळकणार आहे.

Krantee V. Kale

सध्या रुपेरी पडद्यावर कलाकारांची पुढची पिढी मुख्य भूमिकांमध्ये बघायला मिळतेय. राजकारणात किंवा मनोरंजन क्षेत्रात बाप-बेटे एकत्र असणे आता नवं नाही. चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत एका विशेष जोडीचा समावेश होणार आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. 'विष्णूबाळा' या आगामी मराठी चित्रपटातून ही बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ सयाजी शिंदे अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.

‘विष्णूबाळा’ या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत सिद्धार्थ दिसणार आहे. ‘महाविद्यालयीन काळापासून मला या क्षेत्राची ओढ वाटू लागली. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अभिनयाचे रितसर प्रशिक्षण ही घेतले. सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून हे मी ठरवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या पदार्पणाचा आणि वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय, हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं हे दोघे सांगतात. या बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहणे निश्चितच पर्वणी असणार आहे.

‘विष्णूबाळा’ चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेम्यटिक सफारी फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली होत असून, लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. दिग्दर्शनाची धुरा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून यश मिळवलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे सांभाळत आहेत. निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन यांची असून सहनिर्माते सचिन क्षीरसागर आहेत. कार्यकारी निर्माते आदित्य गायकवाड आहेत.

सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?

मीरा-भाईंदरमध्ये पाण्यासाठी हाहाकार; MIDC कडून १५ टक्के पाणी कपात

ब्रेडमध्ये केवळ ६२ टक्के गव्हाचा वापर; CCPA चा ब्रिटानियाला लाखाचा दंड

तानसा, कोलामार्काला राखीव अभयारण्याचा दर्जा; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास वन्य जीव मंडळाची मान्यता

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना बंदी; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी