Sharad Ponkshe Upcoming Movie With son Sneh Ponkshe Instagram
मनोरंजन

Sharad Ponkshe: बाप-लेकाची जोडी करणार धमाल; मुलाच्या पहिल्या सिनेमाची शरद पोंक्षे स्वत: करणार निर्मिती, पहिल्यांदाच एकत्र काम

Sneh Ponkshe: विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे 'बंजारा' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. यात दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Tejashree Gaikwad

Banjara Upcoming Movie: हिंदी मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांनी आपल्या मुलांना लॉन्च करणे हे फारच कॉमन झालं आहे. परंतु मराठी मनोरंजन क्षेत्रात असं शक्यतो घडत नाही. हेच चित्र बदलत अलीकडेच मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमधील एका ज्येष्ठ कलाकाराने आपल्या मुलासोबत चित्रपट घेऊन येत असल्याची घोषणा केली होती. नुकतंच त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचा टिझर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासह हे ज्येष्ठ कलाकार निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 'बंजारा' असे या चित्रपटाचे नाव आहे. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय.

कोण आहे ही वडील-मुलाची जोडी?

मराठी कलाक्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे शरद पोंक्षे. शरद पोंक्षे त्यांचे सुपुत्र स्नेह पोंक्षेसोबत बंजारा हा चित्रपट घेऊन येत आहेत. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले असले तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

निर्मिती क्षेत्रात पदार्पण

नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे 'बंजारा' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे.

याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, "लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात 'बंजारा'चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. खरंतर आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा 'बंजारा' असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच.''

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, " वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा 'बंजारा' आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.''

दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते