मनोरंजन

'या' अभिनेत्रीने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

तिने हॉल शोधताना तिला झालेला मनस्ताप, अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेला कामचुकारपणा यावर या पोस्ट मध्ये भाष्य केले आहे.

नवशक्ती Web Desk

राधिका देशपांडे सध्या तिच्या 'सियावर रामचंद्र की जय' या बालमहानाट्य प्रयोगात व्यस्त असून तिने या महानाट्याच्या प्रयोगासाठी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण प्रशासनाचा गलथान कारभार, बेजबाबदार पणा आणि कामचूकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे तिला नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, आता तिला महानाट्याच्या प्रयोगासाठी सवलतीच्या दरात हॉल मिळाला असून तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

तिने या पोस्ट ला “चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ते “चार हात, दोन फोन, एक नाथ.”

“सियावर रामचंद्र की जय” या अशायाचे कॅप्शन दिले आहे.

यात राधिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. तिने हॉल शोधताना तिला झालेला मनस्ताप, अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेला कामचुकारपणा यावर या पोस्ट मध्ये भाष्य केले आहे. यावेळी तिने दोन लोक वाईट भेटले तर चार लोक चांगले देखील भेटतात, असे म्हटले आहे. यावेळी तिने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे यांना साद घातली असून ती म्हणाली की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण आशेने तुम्हाला टॅग करत पोस्ट टाकली. मला वाटल माझी हाक तुमच्या पर्यंत पोहचणार नाही, पण आर्ततेने मारलेली हाक पोहचली. यंत्रणा हलल्या. आम्हाला हॉल मिळाला असून नाटक सादर केले. तुम्ही प्रभू श्रीरामांचे दूत बनून आमचा मार्ग मोकळा करुन दिलात. तुम्ही आमचा मार्ग मोकळा करुन दिला असून लहान मुलांसमोर एक आदर्श ठेवला आहे. आता मुलं म्हणतात की, "एक नाथ कसा असावा तर असा! धन्यवाद." असा गौरव करत राधिकाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?