मनोरंजन

अखेर शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' फोटोमागचं सत्य; लग्नाच्या चर्चांवर म्हणाला, "Finally...

‘Finally’ अशी कॅप्शन असणारा फोटो शिवने शेअर केला होता. या फोटोमुळे शिव ठाकरेने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते. आता लग्नाच्या फोटोबद्दल सांगणारी एक पोस्ट शिव ठाकरेने शेअर केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि बिग बॉस हिंदी १६चा उपविजेता शिव ठाकरे त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. शिव ठाकरेने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. मुंडावळ्या बांधलेला पारंपरिक वेशातील शिव आणि त्याच्या शेजारी पाठमोरी उभी असलेली नवरी तसेच ‘Finally’ अशी कॅप्शन असणारा फोटो शिवने शेअर केला होता. या फोटोमुळे शिव ठाकरेने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते.

लग्न की शूटिंगचा भाग?

हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी शिव ठाकरेला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आकांक्षा पुरी, विकी जैन, पूनम पांडे, स्मिता गोंदकर, उल्का गुप्ता यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे शिवचे अभिनंदन केले होते. तर काही नेटकऱ्यांनी या फोटोवर शंका व्यक्त केली होती. “हे खरंच लग्न आहे की एखाद्या शूटिंगचा भाग?” असा सवाल काही युजर्सने केला होता. तर काहींनी हा फोटो एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला होता. आता या सर्व चर्चांवर आणि लग्नाच्या फोटोबद्दल सांगणारी एक पोस्ट शिव ठाकरेने शेअर केली आहे.

पुन्हा एकदा 'Finally' ने कॅप्शनची सुरुवात

शिव ठाकरेने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला शिवने "Finally..... First Shoot of 2026" अशी कॅप्शन दिली आहे. शिवने दिलेल्या या कॅप्शनमुळे हा व्हिडीओ खराखुरा नसून शुटिंगमधील सीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

शिवने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लग्नाचा सीन शूट होत असून शिव आणि नवरीची भूमिका साकारणारी त्याची सहकलाकार हे दोघे सप्तपदी घेताना दिसून येत आहेत. आजूबाजूला उभे असलेले लोक टाळ्या वाजवताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये शिव खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, या व्हिडिओमध्ये एक कॅमेरामन व्हिडीओ शूट करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ केवळ शूटिंगचा भाग

शिवने पोस्टच्या कॅप्शनमध्ये "Chalo pack up. Finally..... #firstshootof2026" असं लिहून कॅमेरा आणि हसण्याचा इमोजी दिला आहे. यावरून हा व्हिडीओ केवळ शूटिंगचा भाग असून खऱ्या आयुष्यात शिवचं लग्न झालं नाही, हेच स्पष्ट करणारा आहे. असे असले तरीही, अनेक चाहते शिव ठाकरेच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सहकलाकार कोण?

शिव ठाकरेने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तो शूटिंग सीन असल्याचे स्पष्ट झाले असले तरीही, त्याने सहअभिनेत्रीचा चेहरा व्हिडिओत दाखवला नाही. तिचं नाव, ओळख किंवा कोणतीही टॅगिंग न केल्यामुळे ‘शिव ठाकरेची सहकलाकार नेमकी कोण आहे?’ असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे शिव ठाकरेचा हा आगामी प्रोजेक्ट शूट होऊन प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान

मतदार यादीत नाव सापडत नाहीये? BMC ने हेल्पलाईन क्रमांक केला जारी

Mumbai : ५ कोटींच्या खंडणीसाठी RTI कार्यकर्त्याची आंध्रच्या खासदाराला धमकी; पीएला चाकू दाखवत ७० हजारही लुटले, मुंबईतून अटक

'२५ वर्षे झाली, मला सोडा'; अबू सालेमच्या मागणीवर SC चा सवाल- २००५ पासून गणना कशी केली? नियमांबाबत स्पष्टीकरणही मागवले

KDMC Election : पुणेरी पाटी टाईप संदेशाने सर्वांचीच करमणूक; अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ यांनाच