मनोरंजन

'माझ्या नशिबात काही वेगळं...'; बिग बॉस १६च्या निकालावर काय म्हणाला शिव ठाकरे?

बिग बॉस १६चा विजेता म्हणून एमसी स्टॅनचे नाव घोषित केले, त्यानंतर उपविजेता ठरलेल्या शिव ठाकरेचे चाहते मात्र चांगलेच नाराज झाले

प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी बिग बॉस १६चा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी सगळ्यांना शिव ठाकरे हा विजेता होणार असे वाटत असतानाच एमसी स्टॅनला या सीजनचा विजेता घोषित केले. त्यानंतर उपविजेता ठरलेल्या मराठमोळा शिव ठाकरेच्या चाहत्यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली होती. यासर्व प्रवासाबद्दल आणि निकालाबद्दल पहिल्यांदाच शिव ठाकरेने आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, "जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, माझ्या नशिबात काही वेगळे लिहिलेले असावे. मी खुश आहे की माझ्या मित्रानेच विजेतेपद पटकावले." असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

तो पुढे म्हणाला की, "मी जेव्हा पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरात गेलो, तेव्हाच ठरवले होते की अखेरपर्यंत घरात टिकून रहायचे. जेंव्हा तुम्ही मराठी बिग बॉसमधून हिंदीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला लक्ष केले जाते, पण आपण त्या सर्वांची वाट लावून अंतिमपर्यंत पोहोचलो." असे म्हणत त्याने टीका करणाऱ्यांना टोलाही लगावला. चाहत्यांनी दाखवलेल्या नाराजीवर तो म्हणाला की, "प्रेम करणारे लोकं असतात त्यांना वाईट वाटतच. पण ती ट्रॉफी कोणाला तरी एकालाच मिळते. माझ्यासाठी लोकांच्या डोळ्यात अश्रू आले, ते माझ्यावर प्रेम करत होते आणी मी तिथेच जिंकलो. बिग बॉस बद्दल मला खूप आदर आहे, मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत