मनोरंजन

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतली ही अभिनेत्री होणार आई

खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

निलीमा कुलकर्णी

‘आई कुठे काय करते’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे राधा सागर. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत तिने अभिलाषा ही भूमिका साकारली होती. याशिवाय तिने अनेक मालिकेत आणि चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्रीनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.राधाने तिच्या वाढदिवसाला एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राधा सागर लवकरच आई होणार आहे, प्रेग्नंसी घोषित करणारा एक म्युजिकल व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

राधाने तिचा पती सागर याच्याबरोबर गरोदरपणात खास फोटोशूट केलं. शिवाय सुंदर व्हिडीओही शूट केला. हाच व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अगदी आनंदी दिसत आहे. तसेच वेस्टर्न कपडे परिधान करुन तिने छान फोटोशूट केलं आहे. राधा सागरचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे