मनोरंजन

Sushmita Sen : अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; पोस्टकरून दिली तब्येतीची माहिती

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला (Sushmita Sen) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती तिने नुकतेच पोस्ट करून दिली

प्रतिनिधी

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला (Sushmita Sen) हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याची माहिती तिने नुकतेच इंस्टाग्राम पोस्ट करून दिली. यामध्ये तिने स्वतःच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. यामध्ये तिने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर तिची एन्जियोप्लास्टी झाल्याचेदेखील तिने सांगितले.

सुश्मिता सेनने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. माझी एन्जियोप्लास्टी झाली आहे. माझे कार्डिओलॉजिस्ट म्हणाले की, तुझे हृदय खूप मोठे आहे. पण ही पोस्ट मी तुम्हाला चांगली बातमी सांगण्यासाठी लिहिली आहे. आता सगळं व्यवस्थित असून मी तयार आहे आणखी पुढील काही वर्ष चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी. तुम्हा सगळ्या चाहत्यांचा मी मनापासून आदर करते आणि तुमच्यावर प्रेमही. देवापेक्षा कोणीही मोठे नाही." सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मेन्टेनन्स योग्यच! प्रलंबित देखभाल शुल्क वसूल करण्याच्या सोसायटी निर्णयाला मान्यता

'इंडिगो'ला २२.२ कोटींचा दंड; DGCA ची कारवाई; कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला कडक इशारा

एकाच बाईकवर 'विराट' आणि 'धोनी'! व्हायरल Video पाहून नेटकरी गोंधळले; कमेंट्समध्ये मजेशीर प्रतिक्रिया

दोन महिन्यांनंतर राजकुमार राव आणि पत्रलेखाने दाखवली लाडक्या लेकीची पहिली झलक, नावही केले जाहीर

Thane : स्वतंत्र लढलो असतो तर अधिक मते मिळाली असती; आमदार संजय केळकर यांचे मत