मनोरंजन

'माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय द्या'

TDM च्या कलाकारांना अश्रू अनावर , प्रेक्षकांसमोर जोडले हात

निलीमा कुलकर्णी

'टीडीएम' हा मराठी सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. पण या सिनेमाला शो मिळत नसल्याने दिग्दर्शकासह कलाकारांना अश्रू अनावर झाले. मराठी सिनेमांना प्राईम टाईम न मिळणं हे गेले अनेक महिने सुरु आहे. पण TDM च्या सिनेमा टीमला मात्र यापेक्षा मोठं संकट समोर आलं आहे.

'ख्वाडा','बबन' या दर्जेदार सिनेमांनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांचा 'टीडीएम' (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकार हवालदिल झाले आहेत.

भाऊराव कऱ्हाडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत,"टीडीएम' हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि प्रेक्षक हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र चित्रपटगृहात शो नसल्याने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. माझा सिनेमा आवडला नसेल तर लोकांनी तसं स्पष्ट सांगावं. तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस. त्या दिवशी मी सिनेमा करण्याचं बंद करेन,'' असं म्हणताना भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले आहेत.

यावेळी चित्रपटाचा प्रमुख अभिनेता पृथ्वीराज थोरात म्हणाला, “माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय द्या. तुम्हीच हा चित्रपट मोठा करू शकता, आम्हाला शो मिळत नाहीयेत. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतोय की आमच्या कष्टाचं चीज व्हावं, यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा.”

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती