मनोरंजन

'गदर २'वर प्रेक्षकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया ; काहींनी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट म्हटलंय, तर काहींच्या मात्र...

सध्या 'गदर 2' हा चित्रपट ट्विटर वर हा ट्रेंड करत असून अनेकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू शेयर केला आहे

नवशक्ती Web Desk

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल २३ वर्षांनी 'गदर' या चित्रपटाचा पार्ट २ आज रिलिज झाला आहे. या सिनेमाचं संपूर्ण टीमनं जोरदार प्रमोशनही केलं होतं. प्रेक्षक तारा सिंग आणि सकिना यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सूक होते. 'गदर 2' मधुन पुन्हा तारा सिंह आणि सकिना यांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास आली आहे. अनेक लोकांनी हा चित्रपट फर्स्ट डे, फर्स्ट शो पहिला आहे.

सध्या 'गदर 2' हा चित्रपट ट्विटर वर हा ट्रेंड करत असून अनेकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू शेयर केला आहे. आता या रिव्ह्यूवरुन प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला? आणि हा चित्रपट अपेक्षा पुर्ण करणार का? असे प्रश्न लोकांना पडले आहेत. ट्रेड अनॅलिस्ट तरुण आदर्श यांनी सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाबद्दल ट्विट केलं असून त्यांनी या चित्रपटाला 5 पैकी फक्त दीडच स्टार दिले आहेत. तरुण आदर्श यांना "हा चित्रपट मुळीच आवडला नाही. त्यांना हा सिनेमा सहन करणे खूप कठीण झाले आहे. त्यांनी 'गदर २' निरुपयोगी असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाचा सेकंड हाफ हा पूर्णपणे निरुपयोगी असून या सिनेमाने लोकांची निराशा केली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

'गदर २' बाबात अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या चित्रपटाला छान कॉमेडी चित्रपट असं म्हटलंय, तर काहींना हा सिनेमा फक्त डोकेदुखी वाटला आहे. एकाने तर लिहिलयं, "आताच 'गदर 2 ' पाहिला... हा सर्कस सिनेमा आहे. यामध्ये 'मैं निकला गड्डी लेके' या गाण्याशिवाय दुसरं काही सुद्धा नाही. या चित्रपटापेक्षा भोजपुरी चित्रपट चांगला." तर काही लोकांनी या चित्रपटला चांगलं सुद्धा म्हटलं आहे. एकानं लिहिलयं की, "गदर 2 हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडत आहे. अनिल शर्माने त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा सनी देओलचा सर्वोत्तम सिमेना आहे." तर दुसऱ्याने लिहिलयं की, "#Gadar2ने माझ्या सर्व अपेक्षा पुर्ण केल्या! सनी देओलने ज्या पद्धतीने सिनेमा बनवला आहे तो अविश्वसनीय आहे. एक सिनेमॅटिक उत्कृष्ट नमुना!"

'गदर 2' ला ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांच्या अपेक्ष पूर्ण झाल्या तर काहींना हा सिनेमा बघून निराशा पत्करावी लागली आहे. काहींच्यामते 'गदर' मधले सीन वेगळेच हिट होते. मात्र, 'गदर २' हा इतका प्रभावी नाही. ९० च्या दशकातील अॅक्शन, इमोशन आणि परफॉर्मन्स या सर्व मर्यादेच्या बाहेर गेल्याने हा खूप बॅकडेटेड चित्रपट आहे, असं मत देखील काही लोकांनी व्यक्त केला आहे. तर हा एक विनोद चित्रपट आहे. उत्कर्ष शर्माचं लाँचिंग पुन्हा एकदा अयशस्वी ठरले. सनी देओलचे सीन्स खूपच कमी आहेत. चित्रपटामध्ये व्हिज्युअल भयानक आहेत. संवाद चांगले आहेत, अशा समिश्र प्रतिक्रिया या चित्रपटाला मिळत आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी