मनोरंजन

मन उडू उडू झालं हि मालिका आता एका रंजक वळणावर...

वृत्तसंस्था

झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षक आवडीने पाहात असतात. सोमवार ते शनिवार या मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षक न चुकता बघत असतात. प्रत्येक भागात पुढे काय होणार अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. झी मराठी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी तत्पर असते. आणि त्यांच्या मनोरंजनात कुठेही खंड पडू देत नाही. त्यामुळे येत्या रविवारी देखील प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

मन उडू उडू झालं हि मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. इंद्रा आणि दिपूच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे येत आहेत. देशपांडे सर दिपूच स्थळ जयश्री साळगावकरकडे घेऊन गेले आणि जयश्री ताईनीदेखील हसत हसत या स्थळाला होकार दिला आहे. हा होकार ऐकून कार्तिक आणि सानिकाचा मात्र तिळपापड झाला आहे आणि इंद्रा व दिपू यांचं लग्न कसं होऊ नाही द्यायचं यासाठी ते दोघे कट कारस्थान करत आहेत. ते दोघे आता इंद्रा आणि दिपूपुढे काय संकट निर्माण करणार व इंद्रा आणि दिपू या संकटाला कसे सामोरे जाणार हे रविवारीच्या विशेष भागात दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.

दुसरी मालिका तू तेव्हा तशी या मध्ये सौरभ अनामिकाकडे त्याच्या प्रेमाची कबुली देतो पण अनामिकाला मात्र हे मान्य नाही आहे. इतकंच काय तर सौरभ आणि अनामिकाच्या आईची एका चुकीच्या वेळी भेट होते आणि सौरभच त्याच्या आईवर चुकीचं इम्प्रेशन पडतं. आणि त्यातच वल्ली जाऊन अनामिकाच्या आईचे कान भरणार आहे. त्यामुळे सौरभ आणि अनामिकाची ताटातूट होणार का? हे प्रेक्षकांना रविवारी दुपारी १ रात्री आणि ८ वाजता बघता येणार आहे. झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं आणि तू तेव्हा तशी या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?