मनोरंजन

उर्फीला जीवे मारण्याची धमकी ; पण घाबरेल ती उर्फी कसली, म्हणाली...

उर्फी नेहमीच अशी काहीतरी फॅशन करते की, ती पाहिल्यानंतर नेटकरी डोक्याला हात लावतात.

नवशक्ती Web Desk

आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशनवरून उर्फी जावेद ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या कपड्यांवरून तिला नेहमी ट्रोल केलं जातं. काहींना तिची फॅशन आवडते. तर काही लोक तिच्यावर टीका करतात. उर्फी नेहमीच अशी काहीतरी फॅशन करते की, ती पाहिल्यानंतर नेटकरी डोक्याला हात लावतात.

ती नेहमीच काही ना काही अतरंगी फॅशन करत असते. फॅशन बरोबरच तिच्या बेधडक बोलण्यामुळे देखील उर्फी नेहमी चर्चेत असते. अशातच आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एका व्यक्तीने उर्फीला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उर्फीने स्वत: ट्विटरवर तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

उर्फी जावेदने नुकतच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये एका व्यक्तीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तिने म्हटलं आहे. ति ट्विट केलंय की, "लवकरच तुला गोळी मारली जाणार आहे. हे मिशन लवकरात लवकर पूर्ण होईल, तू भारतात घाण पसरवली आहे ती लवरच साफ होऊन जाईल."

आता सर्वसामान्य माणसाला जर अशी कोणतीही धमकी आली तर तो नक्कीच घाबरला असता. मात्र, घाबरेलं ती उर्फी कसली. या धमकीवर उर्फीनं अशी काही प्रतिक्रिया दिली आहे की, त्यामुळे उर्फी खरच कुणालाच घाबरत नाही की काय? अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. उर्फीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'माझ्या आयुष्यामधील नियमित दिवस.'(Regular day in my life)असं म्हटलं आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली