मनोरंजन

Uorfi Javed : ओठ सुजले, चेहरा झाला लालेलाल... 'लिप फिलर'नंतर उर्फी जावेदचा इन्स्टा व्हिडीओ चर्चेत

नेहमी आपल्या हटके फॅशनसाठी चर्चेत असलेली आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडमध्ये असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आलीये. पण यावेळी तिच्या कपड्यांमुळे नव्हे, तर...

Mayuri Gawade

नेहमी आपल्या हटके फॅशनसाठी चर्चेत असलेली आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडमध्ये असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आलीये. पण यावेळी तिच्या कपड्यांमुळे नव्हे, तर चेहऱ्यावर केलेल्या कॉस्मेटिक ट्रीटमेंटमुळे. उर्फीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं की, तिने आपल्या ओठांवरील ‘लिप फिलर’ हटवला आहे आणि त्याचा अनुभव काहीसा वेदनादायक ठरला!

व्हिडीओमध्ये उर्फी डॉक्टरकडून लिप फिलर रिमूव्हिंग ट्रीटमेंट घेताना दिसत आहे. ज्यामध्ये तिला सुरुवातीला ओठांना इंजेक्शन दिलं जातंय. ज्यामुळे तिचे ओठ सुजलेत आणि ती थोडी त्रस्तही वाटतेय. पण त्याच वेळी हसतानाही दिसते. हा व्हिडीओ शेअर करत उर्फी म्हणते, “नाही, हे कोणतेही फिल्टर नाहीये, हे खरंच माझं तोंड आहे! मी लिप फिलर काढून टाकलं कारण ते नेहमी चुकीच्या जागी दिसायचे. आता परत करणार आहे, पण नैसर्गिक मार्गाने.”

लिप फिलर’ म्हणजे काय?

‘लिप फिलर’ म्हणजे ओठ जरा अधिक जाडसर आणि आकर्षक दिसावेत म्हणून त्यामध्ये जेलसारखं पदार्थ इंजेक्ट करणं. उर्फीने ही ट्रीटमेंट ९ वर्षांपूर्वी, म्हणजे ती फक्त १८ वर्षांची असताना केली होती. आता तिने ते काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. ती म्हणते, “मी फिलर्सविरोधात नाही, पण ते काढणं खरंच खूप त्रासदायक आहे. त्यामुळे असं काही करायचं असेल, तर योग्य डॉक्टरकडेच जा. कारण, फॅन्सी क्लिनिकमध्ये बसलेल्या डॉक्टरांना काही समजत नाही.”

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू