चीनमधील कोळशाच्या खाणीत स्फोट; ८२ कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू (Photo - FPJ)
आंतरराष्ट्रीय

चीनमधील कोळशाच्या खाणीत स्फोट; ८२ कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

उत्तर चीनमधील शान्शी प्रांतात एका कोळशाच्या खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

बीजिंग : उत्तर चीनमधील शान्शी प्रांतात एका कोळशाच्या खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७:२९ वाजता 'लियुशेन्यू' कोळशाच्या खाणीत हा अपघात झाला.

शान्शी प्रांतातील किनयुआन परगण्यामध्ये झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत ८२ जणांचे मृतदेह हाती आले असून, अद्याप ९ कामगार खाणीत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

या भीषण अपघातानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आदेश जारी करत जखमींवर योग्य उपचार आणि सर्वसमावेशक बचाव मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशभरातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या अपघातातून धडा घेण्याची गरज आहे.

पुराबाबतही इशारा

चीनमध्ये सध्या पुराचा मोसम सुरू होत असल्याने, राष्ट्राध्यक्षांनी आपत्कालीन सज्जता मजबूत करण्याचे आणि पूर नियंत्रण उपाययोजना अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनचे उपपंतप्रधान झांग गुओकिंग हे एका विशेष पथकासह घटनास्थळी रवाना झाले असून, ते स्वतः बचावकार्यावर आणि मदतकार्यावर देखरेख ठेवून आहेत.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली