आंतरराष्ट्रीय

गाझात ९४ पॅलेस्टिनींचा मृत्यू

एअर स्ट्राईकमुळे गाझात एका रात्रीत ९४ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तसेच ४५ जणांना वैद्यकीय मदतीची अपेक्षा असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मात्र, इस्रायलच्या सैन्यदलाने एअर स्ट्राईक केल्याचा कोणताही दावा केलेला नाही.

Swapnil S

तेल अवीव : एअर स्ट्राईकमुळे गाझात एका रात्रीत ९४ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तसेच ४५ जणांना वैद्यकीय मदतीची अपेक्षा असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मात्र, इस्रायलच्या सैन्यदलाने एअर स्ट्राईक केल्याचा कोणताही दावा केलेला नाही. गाझा पट्टीत अन्न पुरवण्यासाठी उभारण्यात आलेल्या फाऊंडेशनजवळ पाच लोकांचा मृत्यू झाला, तर अन्य ठिकाणी मदतीच्या अपेक्षेत रांगेत उभ्या असलेल्या ४० जणांचा या एअर स्ट्राईकमध्ये मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत गाझा पट्टीतील ५७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून २२३ जण अद्याप बेपत्ता आहेत.

­­‘ऑल आऊट ५०००’ फटाक्याचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद, फटाक्यांची चाचणी, ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी

तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर सिडकोला सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन

Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीला पार्किंगचे ग्रहण; ग्राहक हैराण, बाजारपेठांत तुफान गर्दी

Thane : दिवाळीच्या शुभेच्छापत्रासोबत गोमातेसाठी ११ किलो चारा! QR कोडद्वारे चारा वितरणाची माहिती आणि छायाचित्रे मिळणार