आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत दहशतवादी हल्ला? प्रथम ट्रकने चिरडले, त्यानंतर हल्लेखोराचा गोळीबार

अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरात भयंकर हल्ला झाला असून, यामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

न्यू ऑर्लियन्स : अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरात भयंकर हल्ला झाला असून, यामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीटवर गर्दीत ट्रक घुसवला व नंतर वाहनातून बाहेर पडून बेछूट गोळीबार केला.

हल्लेखोराने गर्दीत ट्रक घुसवल्याने ट्रकखाली चिरडून १२ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोराने वाहनातून बाहेर पडत गोळीबार करायला सुरूवात केली. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.

दरम्यान, न्यू ऑर्लिन्स हल्ल्यातील हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने ‘सीएनएन’ला सांगितले. जाणूनबुजून हे कृत्य केल्याचे काही पुरावे सापडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एफबीआय आणि पोलीस संयुक्तपणे या हल्ल्यामागे काय हेतू आहे याचा शोध घेण्यासाठी वाहनाची तपासणी करत आहेत.

हा दहशतवादी हल्ला - महापौर कँट्रेल

या घटनेवर प्रतिक्रिया देताना न्यू ऑर्लिन्सचे महापौर लाटोया कँट्रेल यांनी हा “दहशतवादी हल्ला” असल्याचे म्हटले आहे. पण, बुधवारी पहाटे ट्रक गर्दीत घुसला, तेव्हा नेमके काय घडले याचा तपास एफबीआयने सुरू केला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओमध्ये जमिनीवर अनेक जण गंभीर जखमी होऊन पडल्याचे दिसत आहे. ही घटना घडल्यानंतर न्यू ऑर्लिन्स शहर आपत्कालीन विभागाने ‘एक्स’वर पोस्ट करत, या परिसरापासून दूर राहा, असे आवाहन केले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक