आंतरराष्ट्रीय

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उघड; महाड-पोलादपूरच्या आरोपींची धरपकड

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करताना भांबुर्डा (पुणे) वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली.

Swapnil S

पोलादपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करताना भांबुर्डा (पुणे) वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली.

गुरुवारी रात्री झालेल्या या छाप्यात वनविभागाने वाहनासह मुद्देमाल जप्त केला. चार संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून मास्टरमाइंड रोहित शंकर पवार (रा. धामणी, ता. महाड) हा मात्र चकवा देऊन पसार झाला. धरपकड झालेल्या तरुणांमध्ये जय धारिया, स्वप्निल बबन मोरे यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या आरोपीची चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या आरोपींना पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले.

महाड व पोलादपूर तालुक्यातील काही तरुणांनी तरंगणारे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरग्रीसची विक्री पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत करण्याचा डाव आखला. या कामासाठी त्यांनी इनोव्हा कारची व्यवस्था केली. मात्र गुप्त माहितीच्या आधारे भांबुर्डा वनपरिक्षेत्राच्या टीमने वाहनाची झडती घेतली आणि कारवाई केली.

गणपतीवर पर्जन्यवृष्टी; राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार

चाकरमानी चल्ले गावाक! रेल्वे, एसटी, आराम बस, खासगी गाड्या निघाल्या

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटील यांना सरकारचे चर्चेचे आवाहन

SRA बिल्डरांसाठी काम करते! मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले

महाराष्ट्र, केरळच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार