आंतरराष्ट्रीय

कॅनडातील हिंदू मंदिरावर हल्ला; खलिस्तानी इंद्रजीत गोसलला अटक

कॅनडात खलिस्तानी समर्थकांची भीड चेपली आहे. खलिस्तानी समर्थक हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले करत आहेत.गेल्या रविवारी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी ब्रॅम्प्टन येथील इंद्रजित गोसल याला अटक करण्यात आली. त्याच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.

Swapnil S

ओटावा : कॅनडात खलिस्तानी समर्थकांची भीड चेपली आहे. खलिस्तानी समर्थक हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले करत आहेत.गेल्या रविवारी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी ब्रॅम्प्टन येथील इंद्रजित गोसल याला अटक करण्यात आली. त्याच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, इंद्रजित गोसल याला अटक करण्यात आल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर काही अटींवर त्याची सुटका करण्यात आली. पुढील तारखेला तो ब्रॅम्प्टनमधील ओंटारियो कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये हजर होणार आहे. दरम्यान, यापूर्वी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव