आंतरराष्ट्रीय

ऑस्ट्रियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; ९ ठार

ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याने त्यानंतर शौचालयात जाऊन स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

Swapnil S

व्हिएन्ना : ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याने त्यानंतर शौचालयात जाऊन स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

एक विद्यार्थी बंदूक घेऊन थेट शाळेत पोहोचला होता आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर विद्यार्थ्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना सकाळी १० वाजता माहिती मिळताच त्यांनी लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून माहिती दिली की, शाळा रिकामी करण्यात आली आहे आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता कोणताही धोका नाही. ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहराची लोकसंख्या सुमारे ३,००,००० आहे. गोळीबारात काही लोक जखमी देखील झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्राझ शहराचे महापौर एल्के काहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी आहेत. शाळेतील गोळीबाराची चौकशी करण्याची जबाबदारी ‘स्पेशल टास्क फोर्स’कडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहराकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video