बांगलादेशात हिंदू कुटुंबातील ४ जणांची हत्या प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशात हिंदू कुटुंबातील ४ जणांची हत्या

बांगलादेशातील रंगपूर शहरात एका निवृत्त हिंदू शिक्षकासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Swapnil S

ढाका : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका निवृत्त हिंदू शिक्षकासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ६५ वर्षीय गणपती चक्रवर्ती, त्यांची पत्नी प्रितीलता (५०), मुलगी आगामी (२३) आणि मुलगा प्रियम (१२) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुग्धो आणि सिद्धार्थ या दोन चुलत भावांना ताब्यात घेतले आहे.

रंगपूर महानगर पोलीस आयुक्त मोहम्मद अब्दुल माबुद यांनी सांगितले की, “गुरुवारी रात्री संशयित आरोपी शेजारच्या इमारतीवरून चक्रवर्ती यांच्या छतावर जाऊन ‘याबा’ नावाचे अंमली पदार्थ घेत होते. आवाज ऐकून गणपती चक्रवर्ती छतावर गेले असता, आरोपींनी त्यांच्या गमछ्यानेच त्यांचा गळा आवळला. त्यानंतर पत्नीची आणि दोन्ही मुलांचीही गळा आवळून हत्या करण्यात आली.” दासपारा भागातील बंद घरातून शुक्रवारी रात्री या चारही जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश

Thane : मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मत

पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री

Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका