ती मोठी चूक होती, मी माफी मागतो...; एपस्टीन प्रकरणी बिल गेट्स यांनी फाउंडेशन कर्मचाऱ्यांची मागितली माफी Photo : X
आंतरराष्ट्रीय

ती मोठी चूक होती, मी माफी मागतो...; एपस्टीन प्रकरणी बिल गेट्स यांनी फाउंडेशन कर्मचाऱ्यांची मागितली माफी

एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर बिल गेट्स यांनी गेट्स फाउंडेशनमधील कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. समाजमाध्यमांमध्ये ज्याप्रमाणे दावा केला जात आहे, त्याप्रमाणेआपण कोणतेही गैर कृत्य केले नसल्याचे म्हणत गेट्स यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या विशेष अहवालात गेट्स यांनी माफी मागितल्याचे म्हटले आहे.

Swapnil S

लंडन : एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर बिल गेट्स यांनी गेट्स फाउंडेशनमधील कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. समाजमाध्यमांमध्ये ज्याप्रमाणे दावा केला जात आहे, त्याप्रमाणेआपण कोणतेही गैर कृत्य केले नसल्याचे म्हणत गेट्स यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या विशेष अहवालात गेट्स यांनी माफी मागितल्याचे म्हटले आहे. ‘एपस्टीनबरोबर वेळ घालवणे मोठी चूक होती. माझ्या चुकीमुळे इतरांना नाहक त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो’, असे बिल गेट्स म्हणाल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे.

रशियन महिलांसोबत संबंधांचा उल्लेख

अमेरिकेच्या विधी विभागाने अलिकडे प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टीन यांनी लिहलेल्या ई-मेलमध्ये बिल गेट्स यांच्याबाबत विविध दावे करण्यात आले आहेत. अमली पदार्थांसाठी गेट्स यांनी घेतलेल्या मदतीचा उल्लेख या ई-मेलच्या ड्राफ्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच रशियन महिलांसोबत गेट्स यांच्या शारीरिक संबंधांचा उल्लेख देखील यात करण्यात आला आहे.

फाउंडेशनच्या ध्येय-धोरणांच्या विरोधातील कृत्य...

गेट्स पुढे म्हणाले की, ‘फाउंडेशनच्या मूल्य आणि ध्येय-धोरणांच्या विरोधात हे कृत्य आहे. आपले काम संवेदनशील आहे, त्यात प्रतिष्ठा महत्वाची आहे. लोक आपल्याबरोबर काम करायचे की नाही? याचा निर्णय घेऊ शकतात.’ असे गेट्स फाउंडेशनमधील कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले.

कोणतेही गैरकृत्य केलेले नाही : गेट्स

दरम्यान, महिलांसोबत असणारे फोटो एपस्टीनसोबतच्या बैठकीनंतर घेतल्याचा खुलासा गेट्स यांनी केला आहे. त्यासाठी एपस्टीनने विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. मी कोणतेही ‘गैरकृत्य केलेले नाही, मी काही गैर पाहिलेले नाही’, असे गेट्स कर्मचाऱ्यांशी बोलताना म्हणाले. एपस्टीन प्रकरणातील पीडित महिलांसोबत वेळ घालवला नसल्याचे गेट्स यांनी सांगितले.

एपस्टीनला २०११मध्ये पहिली भेट

एपस्टीनला २०११ पासून भेटत असल्याचे गेट्स यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. पण, एपस्टीनच्या इतिहास तपासून पाहिला नव्हता असेही त्यांनी सांगितले. २०१४ पर्यंत त्याच्याशी भेट होत होती. आणि एकदा खासगी जेटने प्रवास केला. पण, रात्री त्यांच्या मालकीच्या ठिकाणी अथवा आयलँडवर थांबलो नाही, असेही गेट्स यांनी स्पष्ट केले.

हायवेवर फूड कोर्ट, पेट्रोल पंप किंवा जोडरस्ता हवाय? सर्व NOC आता एकाच क्लिकवर; सुधारित Rajmarg Pravesh पोर्टल लाँच

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Mumbai : सरकारने थकवले शिक्षण विभागाचे अनुदान; ७२४१.३८ कोटी रुपये मिळविण्यासाठी BMC चा पाठपुरावा सुरूच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

T20 World Cup 2026: आज चुकीला माफी नाही! भारताला झिम्बाब्वेविरुद्ध विजय अनिवार्य