आंतरराष्ट्रीय

वातावरण बदलामुळे पुढील चार वर्षे उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार

वृत्तसंस्था

यंदा एप्रिलमध्येच भारतात वैशाख वणवा पेटला होता. अजून मे महिना जायचा आहे. अंग भाजून निघत आहे. घामाच्या धारांनी सर्वजण हैराण झाले आहेत. कधी हा उन्हाळा संपतोय, असे सर्वांनाच वाटत आहे. विविध शहरांतील तापमान ४६ अंशांवर पोहचले आहे. हा त्रास केवळ यंदाच्या वर्षाचाच नाही तर आणखी चार वर्षे हा त्रास सर्वांना भोगायचा आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

वातावरण बदलाबाबतच्या जगातील अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले की, येत्या पाच वर्षांत पृथ्वीचे तापमान १.५ अंशांनी वाढण्याची शक्यता ५० टक्के आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. २०२२-२६ या काळात विक्रमी उष्णता पसरणार आहे.

पॅरिस येथील वातावरण बदल करारानुसार, पृथ्वीचे तापमान दीड अंशांनी कमी करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लासगो करारात पुन्हा याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.

१.७ अंशाने तापमान वाढू शकते

२०२२-२०२६ दरम्यान, जागतिक तापमान औद्योगिक स्तरापूर्वी १.१ अंश ते १.७ अंश सेल्सीयस असू शकते. मात्र, तापमान दीड टक्क्याने वाढण्याची शक्यता ५०:५० टक्के आहे.

कार्बन डायऑक्साईड वाढत आहे

ब्रिटनच्या हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. लिओन हर्मनसन म्हणाले की, वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढत आहे. जग गरम होत चालले आहे. पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत.

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार ईव्हीएममधील मतांची मोजणी

हवाई दलाच्या ताफ्यात '९७ तेजस फायटर'; ६२ हजार कोटींचा करार

आता पाकिस्तान पूर्ण टप्प्यात! भारताकडून प्रथमच ट्रेनवरून ‘अग्नी-प्राईम’ची चाचणी