आंतरराष्ट्रीय

म्यानमारमध्ये भूकंपातील बळींची संख्या २०५६; ३९०० जण जखमी

म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपातील बळींची संख्या आता २०५६ वर गेली आहे. यात ३९०० जण जखमी, तर २७० जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती सत्ताधारी जुंटानी दिली आहे.

Swapnil S

यांगून : म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपातील बळींची संख्या आता २०५६ वर गेली आहे. यात ३९०० जण जखमी, तर २७० जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती सत्ताधारी जुंटानी दिली आहे.

भूकंपात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून बचाव पथके जखमींना काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी जुंटानी एक आठवड्याचा दुखवटा जाहीर केला आहे.मंडालेतील ग्रेट वॉल हॉटेलच्या ढिगाऱ्यातून तीन दिवसांनी एका महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. तिची प्रकृती स्थिर असल्याचे चीनच्या वकिलातीने सांगितले.

भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराच्या जवळ आहे. म्यानमारमध्ये सर्वत्र भूकंपाने केलेल्या विध्वसांचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे थायलंडची राजधानी बँकॉक येथे सोमवारी कोसळलेल्या इमारतीखाली अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्न पुन्हा सुरू केले. जवळपास ७६ जण या इमारतीखाली अडकले आहेत. तीन दिवसांनंतर अधिकाधिक मृतदेह मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. थायलंडमध्ये भूकंपातील मृतांचा आकडा आता १८ वर गेला आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत