आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांचा दावा फोल; निधी भारताला नव्हे, तर बांगलादेशला दिल्याचे स्पष्ट

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग एक मोठ्या घोषणांचा सपाटा लावतानाच भारताला देण्यात आलेल्या २१ दशलक्ष डॉलरच्या मदतीवरून प्रश्न उपस्थित केले.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग एक मोठ्या घोषणांचा सपाटा लावतानाच भारताला देण्यात आलेल्या २१ दशलक्ष डॉलरच्या मदतीवरून प्रश्न उपस्थित केले. यापैकी पहिला निधी मालदिवमधील निवडणूक प्रक्रियेसाठी होता. हा निधी जवळपास २.२ कोटी डॉलर्स इतका होता. त्याशिवाय २.१ कोटी डॉलर्सचा निधी भारतातील निवडणूक प्रक्रियेचा उल्लेख करून देण्यात आला होता, पण प्रत्यक्षात हा निधी बांगलादेशसाठी देण्यात आल्याचे एका वृत्तामध्ये म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा दावा फोल असल्याचे स्पष्ट झाले.

अमेरिकेने भारतातील लोकशाही व्यवस्था व निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल २१ दशलक्ष डॉलर दिले होते, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि माजी अध्यक्ष जो बायडेन सरकारला यातून कदाचित भारतात दुसऱ्या कुणालातरी निवडून आणायचे असावे, असे विधानही ट्रम्प यांनी केले. या पार्श्वभूमीवर आता हा दावा फोल असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा निधी भारताला नसून बांगलादेशला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताकडे खूप पैसा, आम्ही २१ दशलक्ष डॉलर का देऊ - ट्रम्प

भारतातील निवडणुकीत 'व्होटर टर्नआउट’ वाढवण्यासाठी अमेरिकन डॉलर देण्यात आले. या निधीचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, आपण भारताला १०८ अब्ज रुपये का देत आहोत, त्यांच्याकडे आधीच खूप पैसे आहेत, ते श्रीमंत आहेत. भारत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे, असे ट्रम्प म्हणाले. सदर आर्थिक मदतीचा उल्लेख ट्रम्प यांनी परदेशी हस्तक्षेप असा केला. मात्र, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.

लाचखोरीची योजना

‘व्होटर टर्नआऊट’साठी २१ दशलक्ष डॉलर निधी भारताला देणे ही लाचखोरीची योजना होती, असा हल्ला ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारवर चढविला. भारतातील व्होटर टर्नआऊटची काळजी आपल्याला कशाला, आपल्याकडे समस्या कमी आहेत का, आपण आपल्या टर्नआऊटची काळजी घेऊ, असे ट्रम्प म्हणाले.

एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ने (डीओजीई) सांगितले की, ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ने (यूएसएआयडी) भारतातील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाला २१ दशलक्ष डॉलर दिले. मात्र, भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, ‘यूएसएआयडी’सोबत कोणतीही आर्थिक मदत गुंतलेली नाही.

मतदानासाठी अमेरिकेकडून निधी

डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ‘यूएसएआयडी’ निधीबाबत आपले मत मांडले आणि भारताला अमेरिकेकडून मिळणारा निधी थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. ट्रम्प म्हणाले की, जर भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत देश आहे तर मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी अमेरिकेकडून निधी का दिला जावा?

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप आदर करतो पण, मतदारांची संख्या वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर देणे योग्य नाही, अलीकडेच दोन्ही नेत्यांची भेट होऊन द्विपक्षीय चर्चा झाली. ज्यामध्ये व्यापार, बेकायदेशीर स्थलांतर, संरक्षण आणि ऊर्जा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी या निधीला अनावश्यक म्हटले आणि भारतासारख्या देशाला अमेरिकेकडून अशा आर्थिक मदतीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने घेतली गंभीर दखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर आता परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये विदेशी हस्तक्षेप हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकन प्रशासनाने त्यांच्या निधीबाबत जी माहिती दिली, ती आम्हाला मिळाली आहे. हे दावे खूपच चिंताजनक आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक