आंतरराष्ट्रीय

मस्क अधिकृत निर्णय घेऊ शकत नाहीत! ते केवळ सल्लागार, सरकारी कर्मचारी नाहीत; व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरण

अमेरिकन उद्योगपती ॲलन मस्क हे केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे (डीओजीई) कर्मचारी नाहीत, म्हणून त्यांना सरकारमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे व्हाईट हाऊसने न्यायालयात स्पष्ट केले.

Swapnil S

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकन उद्योगपती ॲलन मस्क हे केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे (डीओजीई) कर्मचारी नाहीत, म्हणून त्यांना सरकारमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे व्हाईट हाऊसने न्यायालयात स्पष्ट केले.

न्यू मेक्सिकोच्या नेतृत्वाखालील १४ अमेरिकन राज्यांनी ट्रम्प आणि मस्क यांच्याविरुद्ध वॉशिंग्टन डीसीमधील फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे. मस्क यांची ‘डीओजीई’ प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने ही राज्ये नाराज असून, या राज्यांच्या मते, मस्क यांनी या पदाद्वारे प्रचंड शक्ती मिळवली आहे, जी अमेरिकन संविधानाचे उल्लंघन आहे.

या प्रकरणाबाबत व्हाईट हाऊसमधील प्रशासन कार्यालयाचे संचालक जोशुआ फिशर यांनी न्यायालयाला माहिती दिली की, मस्क यांची भूमिका केवळ सल्लागाराची आहे. त्यांचे काम फक्त राष्ट्राध्यक्षांना सल्ला देणे आणि प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांपर्यंत सूचना पोहोचवणे आहे.

व्यसनमुक्त नवी मुंबईसाठी अत्याधुनिक सुविधा केंद्र; औषधोपचारांसोबत मानसोपचार, समुपदेशन, योग-ध्यानाची सुविधा

Mira-Bhayandar : मराठीला विरोध करत रिक्षाचालकांचे आंदोलन; २५ रिक्षांवर RTO ची कारवाई

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

Navi Mumbai : सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून डॉक्टरांना दीड कोटींचा गंडा

Thane : सहा कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? महासंघाचा सवाल; ८६ हजार कोटींच्या थकबाकीवरून संताप