एक्स @PBSHABD
आंतरराष्ट्रीय

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड पसिया अखेर जेरबंद

पंजाबमध्ये अनेक दहशतवादी हल्ले करणारा कुख्यात गुंड हरप्रीतसिंग ऊर्फ हॅपी पसिया याला अखेर एफबीआयने (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) अमेरिकेत अटक केली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : पंजाबमध्ये अनेक दहशतवादी हल्ले करणारा कुख्यात गुंड हरप्रीतसिंग ऊर्फ हॅपी पसिया याला अखेर एफबीआयने (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) अमेरिकेत अटक केली आहे. दहशतवादी संबंधांसाठी ‘एनआयए’ने पसिया याच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्याने २०२५ च्या अमृतसर बॉम्बस्फोटाची योजना आखल्याचा तसेच अनेक धमक्या दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे

भारतातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हॅपी पसियाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. तो पंजाबमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे. अलीकडेच पंजाबमधील ग्रेनेड हल्ल्यात त्याचे नाव पुढे आले होते.

अमेरिकन गुप्तचर संस्थेने फोटो पोस्ट करत दिली माहिती

अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘एफबीआय’ने कुख्यात गुंड हरप्रीतसिंगचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले आहे की, सॅक्रामेंटोमध्ये एफबीआय आणि ईआरओने पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या कथित दहशतवादी हरप्रीतसिंगला अटक केली. दोन आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंधित असलेल्या पसिया याने अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. पकडले जाऊ नये म्हणून तो बर्नर फोन वापरत होता.

५ लाखांचे बक्षीस

हॅपी पसियाची अटक ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे. तो पंजाबमधील अनेक ग्रेनेड हल्ल्यांचा सूत्रधार आहे. त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस आहे. दहशतवादी हॅपी पसियाला अमेरिकेत आयसीई आणि एफबीआयने अटक केली. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवादी रिंदा आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित होता. पंजाबमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणण्यात त्याचा हात होता.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास