परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

लंडनमध्ये जयशंकर यांच्या गाडीसमोर गोंधळ; खलिस्तानी समर्थकाने तिरंगा फाडण्याची केली आगळीक

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या लंडन दौऱ्यावर असून यादरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या गाडीसमोर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Swapnil S

लंडन : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या लंडन दौऱ्यावर असून यादरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या गाडीसमोर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका बैठकीनंतर बाहेर पडताना त्यांच्या ताफ्यासमोर लंडनमधील खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला. इतकेच नव्हे, तर जयशंकर बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर आल्यानंतर गाडीत बसताच समोरच्या आंदोलकांमधून एक खलिस्तानी समर्थक गाडीसमोर आला आणि त्याने भारताचा राष्ट्रध्वज फाडण्याची आगळीकही केली.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ब्रिटनच्या दौऱ्यावर असून तिथून पुढे ते दोन दिवसांचा आयर्लंडचा दौरा करणार आहेत. ब्रिटनमध्ये द्विपक्षीय संबंध, व्यापारविषयक धोरण,शिक्षण-आरोग्य या क्षेत्रातील सहकार्य याबाबत ते चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान एका बैठकीनंतर बाहेर पडताना त्यांच्या ताफ्यासमोर लंडनमधील खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला.

बुधवारी संध्याकाळी एस. जयशंकर लंडनमधील चॅथम हाऊसमधील एका बैठकीला उपस्थित होते. बैठक आटोपून ते बाहेर पडत असताना समोर रस्त्याच्या पलीकडेच काही खलिस्तानी समर्थक घोषणाबाजी देत होते. विशेष म्हणजे यावेळी लंडन पोलीसही तिथे उपस्थित होते, पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे.

जयशंकर बाहेर येताच एक खलिस्तानी समर्थक त्यांच्या कारसमोर आला आणि तिथेच त्याने भारताचा राष्ट्रध्वज फाडण्याची आगळीक केली. यानंतर तिथे उभ्या असलेल्या लंडन पोलिसांनी त्याला बाजूला नेले आणि जयशंकर यांचा ताफा पुढे रवाना झाला. मात्र, या घडल्या प्रकारामुळे भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. तसेच, यावेळी लंडन पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका का घेतली, त्यांचेही आंदोलकांना समर्थन होते का, असे सवालही उपस्थित केले जात आहेत.

एस. जयशंकर ४ ते ६ मार्च लंडनमध्ये असून त्यानंतर ६ व ७ मार्च या दोन दिवसांत ते आयर्लंडचा दौरा करणार आहेत. लंडन दौऱ्यामध्ये जयशंकर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यात इतर मुद्द्यांसोबतच संरक्षणविषयक सहकार्याच्या मुद्द्यावरदेखील द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती

Zilla Parishad Election Maharashtra : आज जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा?

भाजपकडून अजितदादांची कोंडी; सावरकरांचे विचार मानावेच लागतील!

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने तोडले तारे; वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संताप

अजब! भाजपने धरला काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; अंबरनाथमध्ये भाजपसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत, शिवसेना विरोधी बाकावर