आंतरराष्ट्रीय

Paris Shooting : ६० वर्षे ओलांडलेल्या व्यक्तीने केला पॅरिसमध्ये बेछूट गोळीबार; २ जण ठार

एकीकडे जगभरात ख्रिसमसची तयारी सुरु असताना पॅरिसमध्ये (Paris Shooting) धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली

प्रतिनिधी

फ्रांसची राजधानी असलेल्या पॅरिसच्या(Paris Shooting) मध्यवर्ती भागात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, ४ जण जखमी झाले असून त्यातील २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका ६० वर्षाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ख्रिसमसच्या सणाला पॅरिसमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी असते. हा गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

पॅरिस पोलिसांनी यानंतर सोशल मीडियावर निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये म्हणाले आहेत की, ख्रिसमसआधी घडलेल्या या प्रकारामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देणे ही आमची जबाबदारी आहे. सध्यापुरते, सर्वसामान्यांनी घटनास्थळापासून दूर राहावे. कारण, यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो. त्या ठिकाणी एका व्यक्तीने गोळीबार केला असून आम्ही ताबडतोब त्याच्यावर नियंत्रणात मिळवले. एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, "एका इसमाने अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. बंदुकीच्या ८ गोळ्या झाडल्याचे मी ऐकले." देशाच्या राजधानीत, मोठ्या बाजारपेठेत घडलेला हा प्रकार अस्वस्थ करणारा आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की कोणत्यातरी माथेफिरूने ही घटना घडवून आणली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन