संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

इम्रान खान यांच्या हत्येच्या वृत्ताने खळबळ; सुरक्षित असल्याचा ‘पीटीआय’ पक्षाच्या नेत्याने केला खुलासा

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मात्र, इम्रान खान तुरुंगात सुरक्षित आहेत, असा खुलासा ‘पीटीआय’चे माजी नेते फवाद चौधरी यांनी माध्यमांकडे केला.

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मात्र, इम्रान खान तुरुंगात सुरक्षित आहेत, असा खुलासा ‘पीटीआय’चे माजी नेते फवाद चौधरी यांनी माध्यमांकडे केला असून त्यांच्या हत्येचे वृत्त सपशेल फेटाळून लावले आहे. यापूर्वीही इम्रान खान यांच्या निधनाच्या आणि हत्येची अफवा पसरवण्यात आली होती. अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी खोटे वृत्त प्रसारित केले असल्याचे फवाद चौधरी म्हणाले.

एका बाजूला लष्कर त्यांना कोणाची भेटू घेऊ देत नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या हत्येचे वृत्त व्हायरल होत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणी नुरीन खान, अलीमा खान आणि उजमा खान यांनी तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यासोबत काही ‘पीटीआय’ पक्षाचे कार्यकर्तेही होते.

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान

पतधोरण समितीची बैठक सुरू; पाव टक्के व्याजदर वाढण्याची शक्यता

...तर पुणे शहर ठप्प होईल; आमदार रोहित पवार यांचा इशारा

पूर्णेकर हत्या प्रकरण : पप्या शिंदेला पुन्हा पाच दिवसांची कोठडी

कायदा, पोलिसांची भीती गरजेची : सर्वोच्च न्यायालय