भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी  Photo- X(@narendramodi)
आंतरराष्ट्रीय

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारत आणि ओमानने गुरुवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट झाली.

Swapnil S

मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारत आणि ओमानने गुरुवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट झाली. आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात बुधवारी ओमानमध्ये दाखल झालेल्या मोदींचे द्विपक्षीय बैठकीपूर्वी मस्कतमधील अल बराका पॅलेसमध्ये सुलतान हैथम यांनी स्वागत केले.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, कृषी, तंत्रज्ञान, नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रे, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यासह विविध विषयांवर विचारविनिमय केला. त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. भारत आणि ओमान यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होणे हा द्विपक्षीय भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.

दोन्ही नेत्यांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर (CEPA) स्वाक्षरी झाल्याचे स्वागत केले आणि हा द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. यामुळे भारत-ओमान धोरणात्मक भागीदारी लक्षणीयरीत्या मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांनी स्वाक्षरी केलेल्या या ‘सेपा’ करारामुळे बाजारपेठेत प्रवेश वाढेल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.

जागतिक आर्थिक पुनर्रचनेच्या काळात हा करार व्यापार विविधीकरण आणि पुरवठा साखळीची लवचिकता यांना पाठिंबा देईल. हा ओमानचा एखाद्या देशासोबतचा दुसरा मुक्त व्यापार करार आहे आणि सुमारे २० वर्षांनंतर त्यांनी केलेला हा पहिला मुक्त व्यापार करार आहे.

भारत-ओमान मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मिळेल : पंतप्रधान

तत्पूर्वी, भारत आणि ओमान यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे (सीईपीए) द्विपक्षीय संबंधांना नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. येथे आयोजित भारत-ओमान व्यवसाय परिषदेत बोलताना, ओमान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी सांगितले की, ही परिषद भारत-ओमान भागीदारीला एक नवीन दिशा देईल. आज आपण एक असा ऐतिहासिक निर्णय घेत आहोत, ज्याचा प्रतिध्वनी येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत ऐकू येईल. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार, म्हणजेच सीईपीए, आपल्या भागीदारीला २१ व्या शतकात नवीन आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे