PM
आंतरराष्ट्रीय

जागतिक हवामान परिषदेत भारतीय मुलीचा निषेध - जीवाष्म इंधनाचा वापर थांवण्यासाठी घोषणा

नवशक्ती Web Desk

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे पार पडलेल्या जागतिक हवामानबदल विषयक शिखर परिषदेत (सीओपी-२८) मंगळवारी १२ वर्षींय भारतीय मुलीने निषेध व्यक्त केला. लिसिप्रिया कांगुजाम असे या मुलीचे नाव असून ती मणिपूरमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे.

मंगळवारी परिषदेच्या अखेरच्या दिवसाचे कामकाज सुरू असताना लिसिप्रिया अचानक हातात एक फलक घेऊन व्यासपीठावर धावली. ‘जीवाष्म इंधनाचा वापर थांबवा. आपली पृथ्वी आणि आमचे भविष्य वाचवा’, असा संदेश त्या फलकावर लिहिला होता. लिसिप्रियाने व्यासपीठावर हा फलक उंचावून तशा आशयाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तिला सुरक्षारक्षकांनी बाजूला नेले. परिषदेचे सरसंचालक राजदूत माजिद अल सुवैदी यांनी लिसिप्रियाच्या उत्साहाचे कौतुक केले आणि उपस्थितांना टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

या घटनेनंतर लिसिप्रियाने एक्सवरून (जुने ट्विटर) काही संदेश प्रसारीत केले. त्यात म्हटले आहे की, 'दुबई परिषदेत घोषणा दिल्यानंतर त्यांनी मला बाहेर काढले आणि माझे ओळखपत्र काढून घेतले. मला ३० मिनिटे थांबवून ठेवले. त्यांना जर खरोखरच जीवाष्म इंधनाचा वापर थांबवायचा असेल तर त्यांनी माझ्या म्हणण्याला पाठिंबा द्यायला हवा होता. मला माझा आवाज उठवण्याचा अदिकार आहे. त्यांनी जे केले ते संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार मुलांच्या हक्कांचे उल्लंघन आहे.’

संयुक्त निवेदनावर अखेरपर्यंत असहमती

दुबईतील हवामान परिषद ३० नोव्हेंबर रोजी सुरू झाली आणि मंगळवारी (१२ डिसेंबर) तिचा समारोप झाला. त्यात सुमारे २०० देशांच्या आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी भाग घेऊन प्रदूषण, तापमानवाढ कमी करण्याच्या उपयांवर चर्चा केली. जीवाष्म इंधनाचा वापर हळूहळू थांबवणे आणि हावामानबदलाला सामोरे जाण्यासाठी विकसित देशांनी विकसनशील देशांना निधी देणे हे मुद्दे तेथे प्रामुख्याने चर्चिले गेले. पण परिषदेच्या समारोपापर्यंत संयुक्त निवेदनावर एकमत होऊ शकले नाही. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्यावर चर्चा सुरू होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस